Shreya Maskar
पावसाळ्यात घरच्या घरी स्वादिष्ट शेगाव कचोरी बनवा.
शेगाव कचोरी बनवण्यासाठी मैदा, बेसनाचे पीठ लागते. तर लाल तिखट, हळद, आमचूर पावडर, गरम मसाला, कसूरी मेथी, मोहरी, जिरे, हिरवी मिरची, लसूण, आलं, तेल, धने, बडीशेप, मीठ, शेंगदाणे पाणी इत्यादी मसाले लागतात.
सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, मीठ आणि तेल टाकून कणीक छान मळून घ्या. पीठाचा गोळा मऊ होण्यासाठी 15 ते 20 मिनिटे बाजूला ठेवून द्या.
एका पॅनमध्ये शेंगदाणे, जिरे आणि बडीशेप घालून छान परतून घ्या. या मिश्रणाची मिक्सला जाडसर पूड करून घ्या.
आता एका भांड्यात ही पूड काढून त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे, लसूण आणि किसलेलं आलं घालून पेस्ट करून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे आले ,लसूण, मिरचीची पेस्ट घालून खरपूस परतून घ्या.
या फोडणीत लाल तिखट, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर आणि कसूरी मेथी घालून सुगंध येईपर्यंत मसाले भाजा.
आता या मिश्रणात बेसन घालून गोल्ड फ्राय होईपर्यंत परतून घ्यावे.
बेसनच्या मिश्रणावर पाण्याचा हबका मारा. मंद आचेवर ७ ते ८ मिनिटे शिजवून घ्या. अशाप्रकारे कचोरीचे स्टफिंग तयार झाले.
मैद्याच्या पिठाची कणीक त्यात बेसणचं सारण भरा आणि छान पिठाचा गोळा करून घ्या. पोळपाटावर गोळा हलक्या हाताने लाटून घ्या.
आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कचोरी मंद आचेवर तळून घ्या.
अशाप्रकारे गरमागरम शेगाव कचोरी तयार झाली. पुदिन्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या.