Saam Tv
प्रत्येक माणसाच्या घरी सणासुदीला काहीतरी गोडाचा पदार्थ केला जातो. त्यात जर वेळच नसेल तर तुम्ही झटपट शिरा तयार करु शकता.
१ कप रवा (सुजी) ,२ कप दूध,१/४ कप तुप ,१/२ कप साखर,१/४ टीस्पून वेलची पावडर, बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स इ.
सर्व प्रथम गॅस ऑन करा. त्यावर कढई ठेवा. कढईत तुप व्यवस्थीत गरम करुन घ्या.
तूप व्यवस्थीत गरम करा.तुप गरम झाल्यावर रवा घाला आणि रवा तपकिरी होईपर्यंत तो भाजून घ्या.
नंतर त्यात उकळलेले दूध घालून रवा मऊ होईपर्यंत शिजवा. मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यात साखर मिक्स करा. सोबत रवा सतत ठवळत राहा.
आता गॅस बंद करुन त्यावर दोन मिनीटे झाकण ठेवा. नंतर छान प्लेट मध्ये सर्व करा.
मऊ सुत शिरी करण्यासाठी बारीक रवा वापरा.
शिरा करताना साखर चवीनुसार वापरा. जास्त प्रमाणात साखर शिऱ्याची चव बदलते.