ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पुणे जिल्ह्यातील बारामती येथे 12 डिसेंबर 1940 रोजी शरद पवार यांचा जन्म झाला.
शाळेत असताना वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी त्यांनी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केलं होतं.
1956 मध्ये त्यांनी शाळेत असताना गोवा मुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दिला.
गोवा मुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता.
कॉलेजमध्ये असताना त्यांनी विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणून काम केले.
विद्यार्थी संघटनेच्या एका कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केलं होतं.
यावेळी शरद पवारांनी केलेले भाषण पाहून यशवंतराव चव्हाण फार प्रभावित झाले.
पुढे त्यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला.