Manasvi Choudhary
आज १६ मे २०२६ हा दिवस शनि जंयती म्हणून साजरा केला जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. शनी जंयती आणि शनी अमावस्या एकाच दिवशी आली आहे.
शनि जंयतीला तुम्ही काही उपाय केल्याने तुम्हाला लाभ मिळेल. जीवनातील संकटे दूर होतील.
शनिजंयतीचा दिवशी शनिची पूजा, मंत्र आणि दानधर्म करण्यासाठी शुुभ मानला जात आहे. शनिजंयतीला शनिदेवाची पूजा केल्याने साडेसातीपासून मुक्ती मिळते.
शनिदोषापासून सुटका होण्यासाठी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने जीवनातील अडथळे दूर होतील.
'ओम शं शनैश्चराय नम:' किंवा 'ओम प्रां प्रीं प्रों स:' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा अभिषेक घाला. शनीदेव प्रसन्न होतील.
काळे तीळ, निळी फुले आणि शमीची पाने शनिदेवाला अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
आजच्या दिवशी तुम्ही काळे कपडे, काळे तीळ, लोखंडी वस्तू दान केल्याने तुम्ही शुभ लाभ होईल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.