Shampoo Tips: शॅम्पू करताना चुकूनही करू नका 'या' ७ चुका; केस होतील खराब, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Shruti Vilas Kadam

केसांवर थेट शॅम्पू लावू नका

शॅम्पू थेट केसांवर लावण्याऐवजी आधी थोड्या पाण्यात मिसळून घ्या. त्यानंतर तो टाळूवर हलक्या हाताने लावा. यामुळे शॅम्पूचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते.

Shampoo Tips | yandex

टाळू जोरात घासू नका

शॅम्पू करताना नखांनी टाळू जोरात घासणे टाळा. यामुळे टाळूला इजा किंवा जळजळ होऊ शकते. बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने मसाज करणे योग्य ठरते.

Shampoo | pinterest

खूप गरम पाण्याचा वापर टाळा

केस धुताना खूप गरम पाणी वापरल्यास टाळूतील नैसर्गिक तेल कमी होऊ शकते. त्यामुळे केस कोरडे आणि रूक्ष होण्याची शक्यता असते. शक्यतो कोमट किंवा साध्या पाण्याचा वापर करा.

Shampoo Tips

केसांच्या संपूर्ण लांबीवर शॅम्पू लावू नका

शॅम्पूचा मुख्य उद्देश टाळू आणि मुळांवरील तेल व घाण स्वच्छ करणे हा आहे. त्यामुळे केसांच्या संपूर्ण लांबीवर जास्त शॅम्पू लावण्याची गरज नसते.

Shampoo Tips

शॅम्पू व्यवस्थित धुऊन काढा

केस धुतल्यानंतर टाळूवर शॅम्पू शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्या. शॅम्पू नीट निघाला नाही तर टाळूला खाज, कोरडेपणा किंवा इतर त्रास होऊ शकतो.

Shampoo Tips

केस वारंवार धुणे टाळा

दररोज किंवा गरजेपेक्षा जास्त वेळा केस धुतल्याने केसांमधील नैसर्गिक तेल कमी होऊ शकते. त्यामुळे आपल्या केसांचा प्रकार आणि टाळूची स्थिती लक्षात घेऊन शॅम्पू करण्याची वारंवारता ठरवा.Shampoo Tips

Benefits of shampooing | pintrest

केसांच्या प्रकारानुसार शॅम्पू निवडा

प्रत्येकाच्या केसांचा आणि टाळूचा प्रकार वेगळा असतो. त्यामुळे तेलकट, कोरडे, कोंडा असलेले किंवा संवेदनशील टाळू यानुसार योग्य शॅम्पू निवडणे महत्त्वाचे आहे. टाळूची समस्या सतत जाणवत असल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Shampoo Tips

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Walking After Dinner Benefits
येथे क्लिक करा