Shruti Vilas Kadam
४ ब्रेड स्लाइस, ५०० मिली दूध, अर्धी वाटी साखर, २ ते ३ चमचे तूप, ४ ते ५ काजू आणि बदाम, ४ ते ५ केशराच्या काड्या,अर्धा चमचा वेलची पूड, पाव वाटी पाणी, सजावटीसाठी पिस्ता आणि बदामाचे काप
ब्रेडच्या स्लाइसचे त्रिकोणी तुकडे करा. तुम्हाला हवे असल्यास ब्रेडच्या कडा कापून वेगळ्या करू शकता.
पॅनमध्ये तूप गरम करून ब्रेडचे तुकडे दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
एका पातेल्यात दूध गरम करा. ते थोडे आटल्यावर त्यात साखर, केशर आणि वेलची पूड घाला. दूध घट्ट होईपर्यंत शिजवा.
दुसऱ्या भांड्यात साखर आणि पाणी घालून गरम करा. साखर पूर्ण विरघळल्यानंतर हलका पाक तयार करा.
तळलेले ब्रेडचे तुकडे कोमट पाकात काही सेकंद बुडवा. त्यानंतर ते प्लेटमध्ये व्यवस्थित मांडून घ्या.
पाक लावलेल्या ब्रेडवर तयार केलेली घट्ट रबडी पसरवा. प्रत्येक तुकड्यावर रबडी व्यवस्थित लागेल याची काळजी घ्या.
वरून काजू, बदाम, पिस्ता आणि केशर घालून सजवा. थंड किंवा कोमट शाही तुकडा सर्व्ह करा.