Shruti Vilas Kadam
ब्रेडच्या स्लाइस, दूध, साखर, तूप, वेलची पूड, केशर, बदाम, काजू, पिस्ते आणि थोडं गुलाबजल हे साहित्य शाही तुकडा बनवण्यासाठी आवश्यक असतं.
ब्रेडच्या कडा काढून स्लाइस त्रिकोणी किंवा चौकोनी कापून घ्या. कढईत तूप गरम करून ब्रेड दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून एकतारी पाक तयार करा. पाकात वेलची पूड आणि केशर घालून चांगले उकळवा.
दूध उकळून घट्ट होईपर्यंत आटवा. त्यात साखर, केशर आणि थोडं गुलाबजल घालून स्वाद वाढवा.
तळलेले ब्रेड साखरेच्या पाकात हलकेच बुडवा, जेणेकरून ते गोडसर आणि मऊ होतील.
प्लेटमध्ये भिजवलेले ब्रेड ठेवा. त्यावर आटवलेलं दूध ओता आणि वरून चिरलेले बदाम, काजू व पिस्ते पेरा
शाही तुकडा गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे सर्व्ह करता येतो. सण, खास मेजवानी किंवा पाहुण्यांसाठी हा पारंपरिक गोड पदार्थ खास लागतो.