Shruti Vilas Kadam
अॅलोव्हेरा जेलमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स असतात. नियमित वापर केल्यास त्वचा उजळते आणि नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.
अॅलोव्हेरा जेलमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे मुरूम, पिंपल्स व लालसरपणा कमी होण्यास मदत होते.
हा जेल त्वचेला चिकट न वाटता ओलावा देतो. कोरडी तसेच ऑइली त्वचेसाठी अॅलोव्हेरा जेल उपयुक्त ठरतो.
सूर्यप्रकाशामुळे आलेला टॅन, जळजळ आणि सनबर्न कमी करण्यासाठी अॅलोव्हेरा जेल खूप फायदेशीर आहे. तो त्वचेला थंडावा देतो.
अॅलोव्हेरा जेल त्वचेची लवचिकता वाढवतो. त्यामुळे सुरकुत्या, फाइन लाईन्स आणि डलनेस कमी दिसण्यास मदत होते.
चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर थोडे अॅलोव्हेरा जेल हातावर घेऊन हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. रात्री लावल्यास अधिक चांगले परिणाम दिसतात.
अॅलोव्हेरा जेलमध्ये मध, गुलाबजल किंवा लिंबाचा रस मिसळून फेस पॅक तयार करता येतो. आठवड्यातून २–३ वेळा वापरल्यास त्वचा अधिक ग्लोइंग दिसते.