Foot Care: गरम पाण्यात पाय ठेवून बसण्याने होतील 'हे' फायदे

Shruti Vilas Kadam

थकवापासून आराम


दीर्घ काळ चालल्याने किंवा सतत उभे राहिल्यामुळे पाय दुखणे, सुन्नपणा व थकवा जाणवतो. गरम पाण्यात पाय ठेवून बसल्यास पायातील स्नायू सैल होतात आणि थकवा कमी होण्यास मदत होते.

Foot Care

रक्तसंचारण सुधारते


गरम पाण्यामुळे रक्तवाहिन्या रुंदावतात. त्यामुळे पायांमधील रक्ताभिसरण सुधारते व स्नायूंना पुरेसे पोषण आणि ऑक्सिजन मिळतो.

Foot Care

चांगली झोप मिळते


झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात पाय ठेवले तर शरीर रिलॅक्स होते. यामुळे झोप लवकर लागते आणि रात्रीची झोप अधिक गहिरी व शांत होते.

Foot Care

तणाव आणि मानसिक ताण कमी होतो


पायांमध्ये अनेक नर्व्ह पॉईंट्स असतात. गरम पाण्याचा त्यावर सकारात्मक परिणाम होऊन मन शांत होते व तणाव, स्ट्रेस कमी होण्यास मदत होते.

Foot Care

सर्दीपासून आराम मिळतो


कोमट पाण्यात पाय ठेवल्याने शरीराला आतून उब मिळते. त्यामुळे सर्दी, झुकाम आणि थंडीमुळे होणारी अस्वस्थता कमी होते.

Foot Care

कोरड्या त्वचेची सुधारणा होते


नियमितपणे पाय कोमट पाण्यात भिजवल्यास एड़्यांचा कोरडेपणा कमी होतो. त्यानंतर स्क्रब व मॉइश्चरायझर लावल्यास त्वचा मऊ आणि निरोगी राहते.

Foot Care

पायाची सूज कमी होते


लांब वेळ बसणे किंवा उभे राहिल्यामुळे पाय सुजतात. गरम पाण्यात पाय ठेवून बसल्यास सूज, अकडन आणि जडपणा कमी होण्यास मदत होते.

Foot Care

ट्रेंडी आणि यूनिक बॅक ब्लाउज डिझाईनसाठी 'हे' पॅटर्न नक्की ट्राय करा

Blouse Back Designs | Saam Tv
येथे क्लिक करा