Shreya Maskar
शाही मशरूम बनवण्यासाठी मशरूम, कांदे, टोमॅटो, आलं, हिरव्या मिरच्या, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, साखर, मलई, काजूची पेस्ट, तूप आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
शाही मशरूम बनण्यासाठी मशरूमचे छोटे तुकडे करून घ्या.
पॅनमध्ये तूप गरम करून कांदा, टोमॅटो, आले आणि हिरव्या मिरच्या परतून घ्या.
टोमॅटो चांगले शिजल्यावर मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
आता दुसऱ्या पॅनमध्ये मीठ, तिखट, गरम मसाला, साखर, मलई आणि काजूची पेस्ट घालून छान मिक्स करा.
मिश्रणाला तेल सुटू लागल्यावर त्यात मशरूमचे तुकडे घाला.
शेवटी कोथिंबीर घालून शाही मशरूमचा आस्वाद घ्या.
गरमागरम नान सोबत शाही मशरूमची मेजवानी करा.