Sewri Fort History: मुंबईतील 'या' किल्ल्याला लाभलाय ऐतिहासिक वारसा; एकदा आवर्जून भेट द्याच

Dhanshri Shintre

शिवडी किल्ला

शिवडी किल्ला हा मुंबईतील परळ बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक प्राचीन दुर्ग असून, इतिहास, निसर्ग आणि शांत वातावरणासाठी ओळखला जाणारा पर्यटनस्थळ आहे.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईच्या बंदरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शहराचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी शिवडी किल्ल्याची निर्मिती केली होती.

उभारणी

हा किल्ला इंग्रजांनी सन १६८० मध्ये उभारला. शहराच्या सुरक्षेसाठी आणि समुद्रमार्गावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचे बांधकाम करण्यात आले होते.

उद्देश

मुंबई बंदरातील व्यापार आणि जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला वॉचटॉवर म्हणून वापरला गेला. सुरुवातीच्या काळात पोर्तुगीजांच्या हल्ल्यापासून संरक्षणातही त्याची महत्त्वाची भूमिका होती.

ऐतिहासिक महत्त्व

१६७२ मध्ये जंजिऱ्याच्या सिद्दींकडून मुंबईवर झालेले हल्ले पाहून इंग्रजांनी अनेक किल्ल्यांची उभारणी आणि दुरुस्ती सुरू केली. त्यात शिवडी किल्ल्याचाही समावेश होता.

मुंबईवर मोठा हल्ला

१६८९ मध्ये सिद्दी याकूत खानाने मुंबईवर मोठा हल्ला केला आणि त्यावेळी शिवडी किल्ला त्यांच्या ताब्यात गेला. या हल्ल्यामुळे शहराला मोठा धक्का बसला.

किल्ल्याचा नंतरचा वापर

नंतर अनेक वर्षे हा किल्ला तुरुंग म्हणून वापरला गेला. त्यानंतर मुंबई पोर्ट ट्रस्टने येथे गोडाऊनची सुविधा उभारली आणि परिसराचा वेगळ्या कामासाठी उपयोग केला.

सध्याची स्थिती

सध्या शिवडी किल्ला उत्तम स्थितीत असून त्याचे पुनरुज्जीवन पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभागाने केले आहे. आता येथे पर्यटकांसाठी आकर्षक स्वरूपात सुविधाही उपलब्ध आहेत.

NEXT: सिद्दीला रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्यात बांधला हा जलदुर्ग; नेमका आहे तरी कुठे?

येथे क्लिक करा