Top Restaurants: जगातील टॉप रेस्टॉरंट्समध्ये भारतातील ७ ठिकाणांचे वर्चस्व

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगातील टॉप रेस्टॉरंट

टेस्टॅट्लासने जगातील टॉप १,००० रेस्टॉरंट्सची यादी जाहीर केली असून भारतातील ७ रेस्टॉरंट्स यामध्ये आहेत.

किती रेस्टॉरंट

यादीत दिल्लीतील ३, मुंबईतील १, कोलकात्याच्या १, बंगळुरूच्या १ आणि केरळच्या १ रेस्टॉरंटचा समावेश आहे.

रेस्टॉरंट्सची नावे

ही यादी रेस्टॉरंट्सच्या ऑनलाइन रिव्ह्यूवर आधारित आहे. चला पाहूया या रेस्टॉरंट्सची नावे आणि खास पदार्थ.

राम आश्रय रेस्टॉरंट

मुंबईतील राम आश्रय रेस्टॉरंट हे दक्षिण भारतीय स्वादांचे खजिना असून उपमाचा रसिकांसाठी खास ठिकाण आहे.

गुलाटी रेस्टॉरंट

नवी दिल्लीतील गुलाटी रेस्टॉरंटमध्ये बटर चिकन आणि शाकाहारींसाठी दाल मखनी चाखणे अनिवार्य आहे.

करीम

दिल्लीतील जामा मशीद परिसरातील हे हॉटेल विविध स्वादिष्ट मांसाहारी पदार्थांसाठी ओळखले जाते.

सेंट्रल टिफिन रूम

बंगळुरू येथील सेंट्रल टिफिन रूम (CTR) मसाला डोस आणि इतर दक्षिण भारतीय पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.

अमरिक सुखदेव

मुर्थलमधील अमरिक सुखदेव हा आलू पराठा खाण्यासाठी परिसरातील अत्यंत प्रसिद्ध आणि आवडता स्थान आहे.

पीटर कॅट रेस्टॉरंट

कोलकात्यातील पीटर कॅट रेस्टॉरंटमध्ये चेलो कबाबची चव घेणे हे विसरू नका.

पॅरागॉन रेस्टॉरंट

केरळमधील पॅरागॉन रेस्टॉरंट त्याच्या चविष्ट बिर्याणी आणि पारंपरिक मलबार जेवणासाठी ओळखले जाते.

NEXT: कोंब आलेले बटाटे आणि कांदे खाल्ले तर काय होते?

येथे क्लिक करा