Dhanshri Shintre
फिटनेस तज्ञ मनकीरत कौर यांनी व्हिडिओद्वारे ७ प्रकारच्या बियांचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिण्याचे फायदे सांगितले आहेत. चला जाणून घेऊया.
कलोनजी पाण्यात कार्बोहायड्रेट, लोह व फायबर भरपूर असतात. सकाळी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हृदय आरोग्य सुधारते आणि पचन व रक्तदाब नियंत्रणात राहतात.
मेथी दाण्यात फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे मुबलक असतात. त्याचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते, आतड्यांचे आरोग्य सुधारते व पोटफुगी कमी होते.
चियाबियांसाठी फायबरची भरपूर मात्रा आहे. सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले सब्जाचे पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते आणि पचन सुधारते.
अंजीरात जीवनसत्त्वे अ, बी कॉम्प्लेक्स, के व क भरपूर प्रमाणात असतात. भिजवलेले अंजीराचे पाणी पचन सुधारते, त्वचा निरोगी ठेवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
केशराचे पाणी त्वचेसाठी लाभदायक आहे. ते त्वचेचा रंग सुधारते, नैसर्गिक चमक वाढवते आणि अनियमित मासिक पाळी संतुलित करण्यासही मदत करते.
सकाळी रिकाम्या पोटी धणे बियांचे पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, शरीर थंड राहते आणि हार्मोन्स संतुलित राहतात; रात्री भिजवून प्यावे.
जिरे व बडीशेप पाणी जळजळ कमी करते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते, ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या कमी होतात आणि पचन सुधारते.