Dhanshri Shintre
कांदा-लसूण आरोग्यासाठी उपयुक्त असले तरी, जास्त प्रमाणात सेवन केल्यास हृदय, पचन किंवा रक्तदाबावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, त्यामुळे योग्य प्रमाणातच खावे.
जास्त प्रमाणात कांदा-लसूण खाल्ल्यास गॅस, पोट फुगणे, पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि इतर पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
पोट नाजूक असलेल्या लोकांमध्ये जास्त कांदा-लसूण खाल्ल्यास पोटदुखी, अपचन आणि इतर पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
कच्चा लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्यास तोंडात जळजळ, अल्सर किंवा इरिटेशन होऊ शकते, त्यामुळे योग्य प्रमाणातच सेवन करणे आवश्यक आहे.
लसणामध्ये असलेले एलिसिन रक्तस्त्राव वाढवू शकते, त्यामुळे ज्या लोकांना रक्तस्रावाची समस्या आहे किंवा औषध घेत आहेत, त्यांनी लसूणाचे सेवन टाळावे.
जास्त कांदा-लसूण खाल्ल्याने एसिडिटी वाढते आणि छातीत जळजळ, पोटदुखी तसेच अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
कांदा-लसूणमध्ये उष्णता असल्यामुळे जास्त सेवन केल्यास शरीरातील तापमान वाढ होते आणि शरीरात उष्णतेशी संबंधित त्रास होऊ शकतो.