ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अंजीर हे शरिरासाठी लाभकारी मानले जाते. अंजीर हे पोषक तत्वांनी भरलेले आहे.
अंजीरमध्ये आयरन मोठ्या प्रमाणात असते. जे शरिरात रक्ताची कमी भरून काढण्यास मदत करते.
अंजीरमध्ये असलेले पोषक तत्वे इन्सुलिन नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर मानली जातात.
अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाणही पुरेसे असते. त्याच्या नियमित सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
अंजीर हे कमी कॅलरी असलेले फळ आहे, जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
अंजीरचे सेवन करणे दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.
दररोज अंजीर खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
अंजीरमध्ये कॅल्शियम असते, जे हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.