Manasvi Choudhary
आज सर्वत्र कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त चंद्राला खीरेचा नैवेद्य अर्पण केला जातो.
शेवयांची खीर करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यामध्ये दूध उकळून घ्या. दूध व्यवस्थिक उकळल्यानंतर त्यात शेवया मिक्स करा.
शेवया आणि दुधाचे मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये लवंग घाला. आता तयार खिरीमध्ये साखर मिक्स करा आणि उकळून घ्या.
नंतर यात चिरलेले ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर मिक्स करा. त्यात अर्धा चमचा तूप मिक्स करून एकत्र करा.
अशाप्रकारे शेवयांची खीर सर्व्हसाठी तयार आहे.