Manasvi Choudhary
आज ६ ऑक्टोबर २०२५ कोजागिरी पौर्णिमा सर्वत्र साजरी केली जाणार आहे.
कोजागिरी पौर्णिमेला धार्मिक मान्यतेनुसार अत्ंयत शुभ मानले जाते.
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात सुईमध्ये धागा घालण्याची परंपरा जपली जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र सोळा कलानी पूर्ण होतो जे अत्यंत चांगले असते.
चंद्रप्रकाशात विशेषत: चंद्रासमोर बसून सुईत धागा घालण्याचा सराव केल्याने दृष्टी सुधारते व डोळे निरोगी राहतात.
असं मानलं जातं की चंद्रप्रकाशात सुईत धागा घातल्याने डोळ्यांच्या समस्या दूर होतात.
ही एक सूक्ष्म प्रथा असल्याने चंद्राच्या प्रकाशात केल्याने एकाग्रता वाढते.
चंद्राच्या किरणांमध्ये औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे डोळ्यांसाठी फायद्याचे मानले जाते.