Siddhi Hande
शेवपुरी सर्वांनाच आवडते. शेवपुरी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते.
शेवपुरी ही झटपट बनते. त्यासाठी जास्त मेहनतदेखील घ्यावी लागत नाही.
सर्वात आधी बटाटे उकडून घ्या. हे बटाटे उकडल्यानंतर मॅश करा.
यानंतर हिरवी चटणी बनवण्यासाठी पुदीना, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं-लसूण वाटून घ्या. त्यानंतर यात थोडं पाणी टाका.
गोड पाणी बनवण्यासाठी चिंच ४-५ तास भिजत ठेवा. यानंतर चिंच मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. यातील जाडसर गर हा गाळून घ्या.
यानंतर शेवपुरीच्या पुऱ्या घ्या. त्यावर मॅश केलेला बटाटा ठेवा.
यानंतर त्यावर गोड आणि तिखट चटणी टाकून घ्या. त्यावर चाट मसाला टाका.
या पुरीवर तुम्ही शेव आणि शेंगदाणे किंवा तिखट डाळ टाकून सर्व्ह करा.