Ruchika Jadhav
अनेक व्यक्तींना पाणीपुरी खाण्यापेक्षा शेवपुरी जास्त आवडते.
त्यामुळे आज घरच्याघरी शेवपुरी कशी बनवायची याची सिंपल रेसिपी जाणून घेऊयात.
शेवपुरीसाठी सर्वात महत्वाचा असतो तो रगडा. पुरीमध्ये सर्वात आधी रगडा टाकून घ्या.
त्यानंतर यामध्ये चाट मसाला एक चिमुट टाकून घ्या.
पुढे धनेपूड आणि शिजलेला बटाटा कुसकरून टाकून घ्या.
त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तिखट आणि गोट खजूर चटनी यात मिक्स करा.
शेवटी अगदी बारीक चिरलेला कांदा वरून टाका. त्याने शेवपुरीला खरी चव येते.
सर्वात शेवटी सर्वांची फेवरेट पिवळी शेव वरतून भरभरून टाका.