Ruchika Jadhav
अगदी ओठांनी तोडावेत असे मऊ गुलाबजाम सर्वांनाच खायला आवडतात.
आता तुमचेही गुलाबजाम फार फेवरेट असतील तर आज त्याची सिंपल रेसिपी जाणून घेऊ.
गुलाबजाम बनवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे खवा आहे. यासाठी साधा खवा घ्यावा.
खव्यामध्ये दूध मिक्स करून चांगलं मळून घ्या. दूधामध्येच आपल्याला इतर वस्तू खव्यात मिक्स करून घ्यायच्या आहेत.
त्यानंतर यामध्ये थोडी मिल्क पावडर मिक्स करा. मिल्क पावडर बाजारात सहज उपलब्ध आहे.
गुलाबजाम चांगला फुलावा यासाठी त्यात आर्धा चमचा बेकींग सोडा टाकून घ्या.
त्यानंतर या पिठाचे गोळे करून ते तेलाच गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्या.
तळलेले गोळे साखरेच्या पाकात सोडा. किमान आर्धा तास तरी हे गुलाबजाम पाकात भिजत ठेवा.