Shreya Maskar
शेवचे लाडू बनवण्यासाठी बेसन, हळद, पाणी, तेल, साखरेच पाक, साखर , ड्रायफ्रूट्स , वेलची पूड, मनुके इत्यादी साहित्य लागते.
शेवचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम चणा डाळ वाटून घ्या.
आता एका प्लेटमध्ये चणा डाळचे पीठ, मीठ आणि पाणी घालून कणिक मळून घ्यावे.
तयार झालेले पीठ शेवाच्या साच्यात घालून बारीक शेव पाडून मंद आचेवर तळून घ्या.
पाक करण्यासाठी पॅनमध्ये पाणी गरम करून त्यात साखर, जायफळ आणि वेलची पावडर घाला.
आता यात ड्रायफ्रूट्स पावडर आणि छोटे तुकडे टाका.
साखरेच्या मिश्रणात शेवचे तुकडे घालून चांगले मिक्स करा.
शेवटी मिश्रण थंड झाल्यावर शेवचे लाडू वळून घ्या.