Shreya Maskar
कटाची आमटी बनवण्यासाठी खोबर्याचा किस, चणा दाळ, चिंचेचा कोळ, शेंगदाणे,गूळ आणि तेल इत्यादी पदार्थ लागतात.
कटाची आमटी बनवण्यासाठी जिरे, काळी मिरी, लवंगा, दालचिनी, तमालपत्र , मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता, गोडा मसाला, मीठ आणि कोथिंबीर इत्यादी मसाले लागतात.
कटाची आमटी बनवण्यासाठी चणा दाळ पाणी घालून चांगली शिजवून घ्या.
शिजवलेल्या चणाडाळचे पाणी काढून बाकी चणा डाळ मिक्सरला वाटून घ्या.
खोबर्याचा किस, जिरे, मिरी, लवंगा, दालचिनी आणि तमालपत्र मंद आचेवर भाजून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून, मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता घालून मिश्रणाला चांगली फोडणी द्या.
यात चणा डाळ, डाळीचे पाणी आणि खडे मसाल्यांचे मिश्रण टाका.
आमटीला उकळी आल्यावर तुम्ही यात चिंचेचा कोळ, शेंगदाण्याचा कूट, गूळ, ओलं खोबरं आणि चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
पुरणपोळीसोबत खाण्यासाठी कटाची आमटी तयार झाली आहे.