Shreya Maskar
पालक भाजी बनवण्यासाठी पालक, ताक, हिंग, लसूण, मीठ, लाल सुकी मिरची, तूप, शेंगदाणे, जिरे, चणाडाळ, मेथीचे दाणे आणि कढीपत्ता इत्यादी साहित्य लागते.
पालक भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून चिरून घ्या.
आता एका बाऊलमध्ये बेसन आणि ताक टाकून व्यवस्थित मिक्स करा.
पॅनमध्ये तूप टाकून त्यात जिरे, हिंग, कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या घालून भाजून घ्या.
पुढे मिश्रणात चणाडाळ, शेंगदाणे, चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित भाजा.
आता या मिश्रणात पालक आणि बेसनाचे ताक घालून मिक्स करा.
फोडणी देण्यासाठी पॅनमध्ये तूप गरम करून त्यात लसूण पाकळ्या, लाल मिरची, हळद घालून मिक्स करून फोडणी द्या.
आता ही फोडणी पालक भाजीवर टाकून चपातीसोबत छान आस्वाद घ्या.