ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पोटाच्या कॅन्सरला गॅस्ट्रिक कॅन्सर असेही म्हणतात. हा आजार पोटाच्या पेशींमध्ये होतो.
पोटाचे कॅन्सर असल्यास शरीर सुरुवातीला काही महत्वाचे संकेत देत असतात. ही लक्षणे कोणती जाणून घ्या.
सुरुवातीच्या टप्प्यात पोटाच्या कॅन्सरची लक्षणे फार कमी दिसतात. पोटदुखी, वजन कमी होणे, मलमध्ये रक्त येणे ही सुरुवातीची काही लक्षणे आहेत.
अचानक वजन कमी होणे किंवा अशक्तपणा जाणवणे ही पोटाच्या कॅन्सरची लक्षणे आहेत.
पोटाच्या कॅन्सरचे एक सामान्य लक्षण म्हणजे अशक्तपणा. यामध्ये हिमोग्लोबिनची पातळी कमी होते. तसेच लाल रक्तपेशींची संख्या कमी होऊ शकते.
सतत चक्कर येणे ही पोटाच्या कॅन्सरचे महत्वाचे लक्षण आहे.
छातीत जळजळ होणे हे देखील पोटाच्या कॅन्सरचे मुख्य लक्षण असू शकते. छातीत बऱ्याच काळ जळजळ होत असेल तर ते धोकादायक असू शकतं.
जेवल्यानंतर पोट फुगणे किंवा वेदना होणे हे देखील पोटाच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.