Shreya Maskar
घरीच सिंपल पद्धतीने रव्याचे मंचुरियन बनवा.
रव्याचे मंचुरियन बनवण्यासाठी रवा, दही, काळी मिरी, मिरची पावडर, बेकिंग सोडा, हिरवी मिरची, लसूण, कांदा, शिमला मिरची आणि कोबी इत्यादी साहित्य लागते.
रव्याचे मंचुरियन बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये रवा, दही, कांदा, शिमला मिरची आणि कोबी टाकून सर्व छान मिक्स करून घ्या.
आता या मिश्रणात काळी मिरी, लाल मिरची पाउडर, बेकिंग सोडा, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
यात पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्या.
तयार पिठाचे छोटे गोळे करून 10-20 मिनिटे बाजूला ठेवून द्या.
त्यानंतर तेलात रव्याचे मंचुरियन खरपूस गोल्डन फ्राय करून घ्या.
रव्याच्या मंचुरियनचा शेजवान चटणीसोबत आस्वाद घ्या.