Shraddha Thik
दैनंदिन जीवनात अनेकांना स्वत:शी बोलण्याची सवय असते.
अनेकदा एकटे असताना तसेच विचार करताना व्यक्ती स्वत:शीच बोलत असतो.
काही वेळेस एखाद्या निर्णयावर ठोसपणे काय उत्तर द्यावे या विचारात व्यक्ती स्वत:शीच संवाद साधत असतो.
मात्र एकांतपणात स्वत:शीच बोलण्याची ही सवय योग्य नाही.
अनेकदा एखाद्या गोष्टीचा सारखा विचार केल्यास, स्वत:शीच बोलत राहल्याने मानसिक समस्या उद्भवतात.
नुसतंच स्वतःशी बडबडणे, गोंधळून जाणे हे मानसिक आरोग्य बिघडण्याचे लक्षण आहे. ज्यामध्ये स्किझोफ्रेनिया हा आजार होण्याची शक्यता असते.
आपण ज्या पद्धतीने स्वतःशी बोलतो त्याचे सकारात्मक किंवा नकारात्मक असे दोन्ही परिणाम आरोग्यावर होतात.