Surabhi Jayashree Jagdish
असं म्हटलं जातं की, ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी काही स्वप्नं पाहणं खूप शुभ मानलं जातं. आज आपण अशाच काही स्वप्नांबद्दल सांगणार आहे.
स्वप्नशास्त्रानुसार, ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी स्वप्नात जर पाण्याने भरलेला भांडं दिसलं तर तो खूप शुभ मानला जातो.
असं म्हटलं जातं की, यामुळे एखाद्या व्यक्तीला भविष्यात लवकरच प्रचंड संपत्ती तसेच जमीन लाभ मिळू शकतो. हे शुभ बातमी देखील दर्शवते.
जर तुम्ही स्वतःला ब्रह्म मुहूर्तात पवित्र नदीत स्नान करताना किंवा डुबकी मारताना पाहिलं तर ते खूप शुभ असतं.
जर तुम्ही स्वतःला ब्रह्म मुहूर्तात नोकरीसाठी मुलाखत देताना पाहिले तर ते शुभ संकेत देतं.
याचा अर्थ असा की तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसंच, तुम्हाला लवकरच नोकरीची ऑफर मिळण्याची अपेक्षा करू शकता.
स्वप्नात धान्य दिसणे म्हणजे तुमचे काही महत्त्वाचे काम होणार आहे. असे मानले जाते की धान्य दिसणे म्हणजे आर्थिक लाभ देखील होतो.