Saam Tv
बऱ्याच वेळेस स्वप्नात अनेक घटना घडत असतात. काहींना साप दिसतो, काहींना वाघ दिसतो, काहींना समृद्र दिसतो.
आपल्याला स्वप्नात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा स्वप्न शास्त्रात काहीना काही अर्थ असतो. जर तुमच्या स्वप्नात काळा साप आला तर त्याचा काय होतो हे जाणून घेऊया.
ज्योतिष शास्त्राच्या मते स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी भविष्यात होणाऱ्या वाईट घटनांचे संकेत देतात.
मात्र काही स्वप्न ही शुभ मानली जातात तर काही अशुभ. तसेच स्वप्नात जर साप दिसत असेल तर तो शुभ आणि अशुभ मानला जातो.
जर स्वप्नात साप तुमचा पाठलाग करत असेल तर भविष्यात काही तर वाईट आणि अशुभ घडणार हा संकेत मानला जातो.
जर तुमच्या स्वप्नात साप मेलेला असेल तर तुमच्या आयुष्यात काही तरू शुभ घटना घडणार असं मानलं जातं.
मेलेला साप स्वप्नात आला की, घरात सुख-समृद्धी येते. पैसा येतो, भरभराट येते. म्हणून मेलेला साप शुभ मानला जातो.