Tanvi Pol
सातारा जिल्ह्यातील जगभरातील अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात.
खास करुन सातारा जिल्ह्यातील एक विहीरीतील गुप्त महाल पाहण्यासाठी विशेष गर्दी करत असतात.
साताऱ्यातील नेमक कुठे आहे हे गाव चला तर जाणून घेऊयात.
सातारा जिल्ह्यातील लिंब गावातील एका विहीरीत गुप्त महाल आहे.
या विहीरीचे नाव बारामोटेची विहीर आहे अर्थात बारा मोटा असलेली विहीर होय.
ही विहीर म्हणजे वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, म्हणजेच संभाजी महाराजांचे पुत्र, शाहू महाराज ह्यांच्या कारकिर्दीमध्ये ही विहीर बांधण्यात आली.