Crocodile Mummy Egypt: वैज्ञानिकांनी उघडलं ३००० वर्षांपूर्वीचं मगरीचं ममी; आत दडलेलं रहस्य जगाला थक्क करणारं

Surabhi Jayashree Jagdish

मगरीचं ममी

डिजिटल अॅप्लिकेशन्स इन आर्कियोलॉजी अँड कल्चरल हेरिटेजमध्ये एक नवा स्टडी प्रकाशित झालाय. या अभ्यासात प्राचीन इजिप्तमध्ये मगरीची ममी कशी तयार केली जात होती याबाबत आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.

अत्याधुनिक 3D रेडिओग्राफी तंत्रज्ञान

वैज्ञानिकांनी अत्याधुनिक 3D रेडिओग्राफी तंत्रज्ञानाचा वापर करून या प्राण्यांचं जीवन आणि मृत्यूशी संबंधित रहस्यांचा शोध घेतला आहे. प्राचीन इजिप्तमध्ये मगर फक्त एक भयानक शिकारी नव्हती, तर ती एक ताकद, सामर्थ्य आणि संरक्षणाचं प्रतीक मानलं जात होती.

संशोधनातून काय आलं समोर?

सुमारे 3,000 वर्षे जुनं मगरीच्या ममीच्या नमुन्यांचा अभ्यास केल्यानंतर याची माहिती मिळाली. वैज्ञानिकांनी नवीन आणि नुकसान न पोहोचवणारी तंत्रज्ञान वापरलं, ज्यामुळे ते मगरींचे अवशेष न बिघडवता त्यांचा अभ्यास करू शकले.

मगरींना विशेष स्थान

मगरींना नाईल नदीच्या देवता सोबेकचे प्रतीक मानले जात असं. या अभ्यासांमधून स्पष्ट झालं की, इजिप्तच्या समाजात मगरींना किती विशेष स्थान होतं.

मगरी ममीतील रहस्य

3D रेडिओग्राफी तंत्रज्ञानाच्या वापराने वैज्ञानिक मगरीच्या ममीच्या शरीराच्या आतील भाग पाहू शकले. एक्स-रे आणि सीटी स्कॅनमुळे मगरी अंतर्गत अवयवांचे स्पष्ट फोटो मिळाली आहेत. जी ममी बनवताना सुरक्षित राहिले होते.

काय विशेष आढळलं?

मानवांच्या ममींच्या तुलनेत मगरींनी संशोधनासाठी एक दुर्मिळ संधी दिली आहे. मगरमच्छांच्या पचनसंस्थेचे अवशेष सुरक्षित राहिल्यामुळे त्यांच्या आहाराबद्दल आणि त्यांना कसे पकडले गेले याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.

मगरींच्या पोटात काय सापडलं?

यावेळी मगरीच्या पोटात गॅस्ट्रोलिथ्स नावाचा दगड सापडला. जो मगरी अन्न पचवण्यासाठी गिळतात. हे सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सामान्य आहे. याशिवाय त्यांच्या पोटात कांस्याचा मासेमारीचा हुक अडकला होता. याचा अर्थ त्यांना जाणूनबुजून पकडण्यात आलं होतं.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान पुढं कुठे पळून गेला?

येथे क्लिक करा