ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
"तिन्हीसांजेला झोपू नकोस" असं आपली आई आपल्याला नेहमी बजावत असते.
तिन्हीसांजेला घरात देवी देवतांचे मुख्यतः लक्ष्मीचे आगमन होणार असते, अशी मान्यता आहे.
मग यावेळी घरात कोणी आळसपणा करत झोपलेलं असेल. तर हे बघून लक्ष्मी रागावून परत जाते. असे म्हटले जाते.
पण यामागचे खरे आणि वैज्ञानिक कारण तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊया.
तिन्हीसांज म्हणजे सूर्यास्ताच्या नंतरच्या वेळेस पोटातील अग्नी मंद झालेला असतो.
अशात यावेळी झोपल्यास पोटातील अग्नी शांत होतो. पचनशक्ती अधिक मंदावते व भूक लागत नाही.
यामुळे अपचन होण्याची शक्यता अधिक वाढते. आणि मळमळणे, पोट दुखणे, पोटात जळजळ होणे अशा समस्या जाणवतात.
शिवाय संध्याकाळ नंतर झोपल्यास रात्री नियमित वेळेस झोप लागत नाही.
झोपेचे चक्र बिघडल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मानसिक तणाव, अस्थिरता आणि अशांतता वाढण्याची शक्यता असते.