ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आज रात्री भारतातून दुर्मिळ चंद्रग्रहण म्हणजेच ब्लड मून दिसणार आहे.
आजची रात्र खगोल प्रेमींसाठी विशेष आकर्षण असणार आहे.
पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, कि चंद्राचा रंग नक्की लाल होतो तरी कसा?
हे चंद्रग्रहण तेव्हा होते जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात.
चंद्राच्या पृष्ठभागावर पृथ्वीची सावली पडते.
सूर्याचाप्रकाश पृथ्वीच्या वातावरणाच्या संपर्कात आल्यास सूर्यप्रकाशातील निळा आणि जांभळ्या रंगाचा प्रकाश विखुरला जातो.
याऊलट सूर्यप्रकाशातील लाल आणि केशरी रंगाचा प्रकाश विखुरला जात नाहीत. ते थेट चंद्रापर्यंत पोहोचतात.
यामुळे पृथ्वीच्या सावलीआड असलेला चंद्र लाल रंगाचा दिसतो.
या लाल रंगामुळेच हा चंद्रग्रहण ब्लड मून किंवा रक्तचंद्र म्हणून ओळखलं जातं