ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आज रात्री ८ वाजून ५९ मिनिटांनी वर्षातले शेवटचे आणि दुर्मिळ चंद्रग्रहण सुरू होईल.
यावेळी धार्मिक आणि ज्योतिषीय मान्यतांनुसार काही चुका करणे टाळले पाहीजे.
चंद्रग्रहणाच्या काळात विशेषतः सुतक काळात अन्न किंवा पाणी ग्रहण करणे टाळावे.
चाकू, कात्री, सुया यांसारख्या धारदार आणि टोकदार वस्तूंचा वापर करणे टाळावे.
या काळात बाहेर फिरणे शक्यतो टाळावे. विशेषतः गर्भवती स्त्रियांनी.
ग्रहण काळात झोपणे टाळावे असे सांगितले गेले आहे.
कोणतेही शुभ कार्य किंवा पुजा करणे टाळावे.
काही चुकांचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यावेळी घरात शांत राहून प्रार्थना करणे आणि आत्म-शिस्त पाळणे महत्त्वाचे मानले जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.