Sakshi Sunil Jadhav
रविवार, 6 सप्टेंबर 2026 रोजी SBIच्या काही डिजिटल बँकिंग सेवांमध्ये तांत्रिक बिघाडामुळे अडथळे आले आहेत.
SBI UPI, IMPS आणि YONO या सेवांचा वापर करणाऱ्या ग्राहकांना व्यवहार करताना अडचणी येत होत्या.
बँकेने या सेवा पूर्णपणे बंद नसून ‘इंटरमिटंट’ म्हणजेच अधूनमधून उपलब्ध होत नसल्याचे सांगितले.
समस्या दूर करण्यासाठी तांत्रिक पातळीवर काम सुरू असल्याची माहिती SBIने दिली.
SBIने सुरुवातीला 6 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजेपर्यंत डिजिटल सेवा सामान्य होण्याची शक्यता व्यक्त केली होती.
तातडीच्या पेमेंटसाठी ग्राहकांनी UPI Liteचा, तर रोख पैशांसाठी ATM सेवेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
UPI, IMPS किंवा YONOवर व्यवहार अयशस्वी झाल्याने सतत प्रयत्न न करता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करण्याचा सल्ला देण्यात आला.
SBIने दुपारच्या अपडेटमध्ये UPI, IMPS आणि YONO सेवा 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11:49 वाजल्यापासून उपलब्ध असल्याचे सांगितले.
NEXT : रात्रीच्या 'या' ६ सवयी तुमच्या किडनीचा घात करतात, दुर्लक्ष केल्यास डायलिसिसची वेळ येईल