ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
एसबीआय कार्डने क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी नियम बदलले आहेत, जे १ सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून लागू होतील.
नियम बदलानुसार, काही एसबीआय कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना मिळणारे फायदे कमी करण्यात आले आहेत.
सप्टेंबरच्या पहिल्या दिवसापासून या कार्ड्स वापरून केलेल्या काही व्यवहारांवरील रिवॉर्ड पॉइंट्स रद्द केले जात आहेत.
या नवीन नियामाचा लाइफस्टाइल होम सेंटर एसबीआय कार्ड, लाइफस्टाइल होम सेंटर एसबीआय कार्ड सिलेक्ट आणि लाइफस्टाइल होम सेंटर एसबीआय कार्ड प्राइम धारकांवर याचा परिणाम होईल.
तसेच क्रेडिट कार्डचा वापर करून ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या व्यवहारांवर कोणतेही बक्षीस दिले जाणार नाही. बँकेने आपल्या नोटिफिकेशनमध्ये असेही म्हटले आहे की, मर्चेंट ट्रानजॅक्शनवर देखील रिवॉर्ड पॉइंट्स रद्द् केले जात आहेत.
याशिवाय, जर ग्राहकाने कोणत्याही सरकारी पोर्टलवर किंवा सरकारी सेवांसाठी कोणत्याही प्रकारचा व्यवहार केला तर रिवॉर्ड पॉइंट्स देखील दिले जाणार नाहीत.
जुलै आणि ऑगस्टच्या महिन्यात देखील एसबीआय कार्डने एक बदल केला होता आणि क्रेडिट कार्डवरील ५० लाख ते १ कोटी रुपयांचे मोफत विमान अपघात कव्हर बंद केले होते.