Saam Tv
महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी एसबीआय बॅंकेने खास योजना आणली आहे.
या स्किमचं नाव अस्मिता लोन असे आहे.
यात सर्वसामान्य स्त्रियांना कमी व्याजदरात लोन काढण्याची संधी मिळणार आहे.
यामध्ये विशेषत: उद्योगासाठी किंवा उद्योग वाढावा म्हणून आर्थिक मदत करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे.
यासोबत एसबीआय बॅंकेने नारी शक्ती डेबिट कार्ड लॉन्च करण्याची कामगिरी पार पाडली आहे.
हे डेबिट कार्ड फक्त महिलांसाठी डिजाईन करण्यात आले आहे.
याच डेबिट कार्डच्या माध्यमातून महिला अस्मिता लोनचे पैसे काढू शकणार आहेत.
तसेच नारी शक्ती डेबिट कार्ड RuPay द्वारे चालवले जाणार आहेत.