Shraddha Thik
अभिनेत्री सायली संजीवचा व्हिडिओ काही दिवसांपासून व्हायरल होत आहे.
तिने आयुर्वेदातील तक्रकल्प म्हणजे ताक पिण्याच्या डाएटबद्दल सांगितले आहे.
महिन्यातून 3 तीन दिवस फक्त ताक प्यायचं. ताजं ताक बनवून त्यात काळं मीठ घालून ताक प्यायचे.
संध्याकाळपर्यंत तुम्ही कितीही ताक पिऊ शकता. यामुळे तुमची स्किन, पोट क्लिंज होण्यास मदत होते.
काही ठराविक विकारांमध्ये ताकाचा रोजच्या आहारातील वापर वाढवावा लागतो. याचा अर्थ जेवणाऐवजी ताक प्यावं असं नाही.
याचे दुष्परिणामही उद्भवू शकतात कारण ताकात पाण्याचे प्रमाण जास्त असते. 3 दिवस सलग पाणी पिऊन केलेल्या उपवासाप्रमाणे हे आहे.
अशक्तपणा येणं, पित्ताचे त्रास वाढणं असे त्रास उद्भवतात. आयुर्वेदानुसार ताकाचे अनेक फायदे असले तरी सलग ताकच प्यावे असा कोणताही संदर्भ आयुर्वेदात नाही.