Shraddha Thik
केसांना गायीचे तूपाचा वापर हा नवीन केस येण्यासाठी, केस दाट करण्यासाठी, केस जाड होण्यासाठी घरगुती उपाय म्हणून देखील केला जातो.
जर तुमच्या केसांमध्ये डेंड्रफ आहे तर तुम्ही आपल्या स्काल्पमध्ये घरगुती तूप आणि बदाम तेल लावून मालिश करा. यामुळे डेंड्रफ पासून सुटका मिळेल. याच सोबत स्काल्प मध्ये कोरडी त्वचा किंवा ड्राइनेस असल्यास ही समस्या देखील दूर होईल.
जर तुमच्या केसांना फाटे फुटत असल्याने तुम्ही काळजीत असाल तर घरगुती तूप यावर उपाय आहे. तुपाने स्काल्प वर मसाज केल्याने हि समस्या दूर होईल. तूप आपल्या केसांना भरपूर पोषण देते आणि यामुळे फायदा मिळतो.
केसांची वाढ कमी आहे, काळजी करू नका. केसांना घरगुती तूप लावून मालिश करा. याच सोबत तुम्ही आवळा आणि कांद्याचा ज्यूस पण यामध्ये मिक्स करू शकता. असे केल्यामुळे तुमचे केस सुंदर होण्यासोबत लांब होतील. नवीन केस येण्यासाठी मदत होईल. केस काळे राहण्यास मदत होईल.
घरगुती तूप लावल्याने केसांचा गुंता काढण्यासाठी मदत होईल. तुपामध्ये थोडे ऑलिव्ह ऑइल मिक्स करा यामुळे गुंता निघण्यास सोप्पे होईल.
तुमच्या केसांची नैसर्गिक चमक पुन्हा मिळवण्यासाठी घरगुती तूप थोडेसे गरम करून 20 मिनिट केसांना मालिश करायची आहे. यानंतर केसांमध्ये लिंबाचा रस लावून 10 मिनिट तसेच ठेवा. असे केल्यानंतर केसांना व्यवस्थित थंड पाण्याने धुवून घ्या.
बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या कंडीशनरमध्ये केमिकल्स असतात ज्यामुळे केस नाजूक होतात. यासाठी केसांना कंडीशनर करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे केसांना तूप लावून मालिश करणे. आणि महत्त्वाचे म्हणजे गायीच्या साजुक तुपाने केसांना मालिश केल्याचे कोणते ही वाईट साईड इफेक्टस नाहीत.