ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वाढत्या वयासह त्वचेचे सौंदर्यही हरवत जाते. चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात.
यावर उपाय म्हणून अनेक स्त्रीया महागडे ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात.
पण या प्रोडक्ट्समधील केमिकल्समुळे त्वचेला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते.
जवस आणि लवंगचा घरगुती फेसपॅक यासगळ्यापासून तुम्हाला वाचवू शकतो.
या फेसपॅकमुळे त्वचेवरील सुरकुत्या तर कमी होतातच शिवाय जबरदस्त ग्लो देखील मिळतो.
फेसपॅक बनवण्यासाठी जवस व लवंग पाण्यामध्ये पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. जेल बेस फेस पॅक तयार होईल.
रात्री झोपण्याआधी थोडावेळ चेहऱ्यावर लावा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका.
जवसाच्या बियांमध्ये म्युसिलेज असते. जे त्वचेला नैसर्गिकरित्या हायड्रेशन देते.
लवंग थंड गुणधर्माचे असल्यामुळे त्वचेवर होणारी जळजळ आणि सूज कमी होते. यामुळे पुरळ किंवा मुरूमे येत नाहीत.