Shreya Maskar
सणासुदीला चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी घरीच पपईच्या सालीचा फेसपॅक लावा.
पपईचा फेसपॅक बनवण्यासाठी पपईची साल मिक्सरला वाटून घ्या.
एका बाऊलमध्ये दही, मध आणि पपईच्या सालीची पेस्ट मिक्स करा.
यात तुम्ही गुलाब जल देखील टाकू शकता.
15-20 मिनिटे फेसपॅक चेहऱ्याला लावून नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.
पपईच्या सालीचा फेसपॅकमुळे त्वचा चमकदार आणि मुलायम होते.
त्वचेचा काळेपणा आणि सुरकुत्या देखील कमी होण्यास मदत मिळते.
महिन्यातून 2-3 वेळा पपईच्या सालीचा फेसपॅक चेहऱ्याला लावा.