Manasvi Choudhary
तुमच्याही त्वचेवर वारंवार पिपंल्स येत असतील तर लाईफस्टाईलमध्ये काही बदल करणे महत्वाचे आहे.
एखाद्याशी फोनवर बोलताना हँड्स फ्री डिव्हाईस वापरा. कारण फोनच्या स्क्रिनवर पिंपल्स येणारे जिवाणू असू शकतात.
दर तीन दिवसांनी उशीचे कव्हर बदला किंवा सॅटिन उशी वापरा. उशीच्या कव्हरमुळे त्वचेवर पिंपल्स येतात.
चेहरा धुतल्यानंतर कोरडा करण्यासाठी सुती कापडाचा वापर करा.
तुम्ही चष्मा वापरत असाल तर वेळोवेळी स्वच्छ करा. चष्म्यावर असणाऱ्या जिवाणूंमुळे त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात.
पिंपल्स कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय म्हणून हळदीचा वापर करा. हळदीमध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात.
निरोगी त्वचेसाठी शरीरात पुरेसे प्रमाणात पाणी असणे महत्वाचे आहे.दिवसभरात भरपूर पाणी प्या.
वरील सर्व सवयींमुळे तुम्ही चेहऱ्यावरील पिंपल्सच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता.