Dhanshri Shintre
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज १९४वी जयंती आहे.
या भारताच्या पहिल्या शिक्षिका मानल्या जातात.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला.
सावित्रीबाई फुले समाजसुधारक केवळ नव्हत्या, तर त्या एक तत्त्वज्ञ आणि कवयित्री म्हणूनही ओळखल्या जातात.
सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली, जे शिक्षण क्षेत्रातील एक ऐतिहासिक पाऊल होते.
फुले दाम्पत्याने भारतभर १८ शाळा सुरू केल्या. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने त्यांची दखल घेतली आणि त्यांचा आदर केला.
सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी 'सत्यशोधक समाज' स्थापन केला, ज्या समाजात पुजारी आणि हुंड्याशिवाय विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जात होते.
NEXT: कुंभमेळानिमित्त प्रयागराजमधील 'हे' आहेत लोकप्रिय सर्वोत्तम स्नॅक्स