Shruti Vilas Kadam
बडीशेप आणि जिऱ्यामध्ये पचनास मदत करणारे घटक असतात. सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्यायल्याने पचनसंस्था सक्रिय होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
जिऱ्यामुळे पोटातील वायू कमी होतो, तर बडीशेप आम्लपित्तावर आराम देते. त्यामुळे गॅस, जळजळ आणि पोटदुखीपासून दिलासा मिळतो.
हे पाणी मेटाबॉलिझम वाढवते, ज्यामुळे चरबी जळण्यास मदत होते. नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला हातभार लागतो.
बडीशेप-जीरा पाणी शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. यामुळे शरीर स्वच्छ राहते आणि थकवा कमी जाणवतो.
बडीशेप आणि जिऱ्यात अँटिऑक्सिडंट्स व अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
पचन नीट झाल्याने त्वचेवर मुरुमे, डाग कमी होतात आणि त्वचा स्वच्छ व तजेलदार दिसू लागते.
सकाळी हे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट होते, सुस्ती कमी होते आणि दिवसाची सुरुवात उत्साही व ताजेतवानी होते.