Manasvi Choudhary
भारतीय संस्कृतीत पूजा, गणपत्ती पूजन किंवा सत्यनारायणाची पूजेला महाप्रसाद म्हणून गोड शिरा असतोच.
इतरवेळी बनवलेला शिरा आणि प्रसादाचा शिरा हा नेहमी वेगळाच लागतो. आपल्यापैकी पूजेला खास शिरा बनवला जातो. प्रसादाचा शिरा सर्वजण आवडीने खातात.
प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी बारीक रवा, साखर, तूप, दूध, केळी, ड्रायफ्रुट्स, वेलची, तुळशीची पाने हे साहित्य एकत्र करा.
गॅसवर एका पातेल्यामध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुसऱ्या एका कढईमध्ये साजूक तुपामध्ये रवा भाजून घ्या.
रवा अर्धा भाजून झाला की त्यात केळीचे काप आणि ड्रायफ्रुट्स मिक्स करा. केळी रव्यासोबत व्यवस्थित मॅश होईपर्यंत परता. केळीमुळे प्रसादाला एक वेगळीच चव आणि सुगंध येतो.
रव्यात गरम केलेले दूध हळूहळू मिक्स करा. ढवळत राहा जेणेकरून गाठी होणार नाहीत. झाकण ठेवून २-३ मिनिटे मंद आचेवर वाफ काढा.
या संपूर्ण मिश्रणात नंतर साखर मिक्स आणि मिश्रण एकजीव करा. साखर मिश्रणात संपूर्ण विरघळून द्या.
नंतर यात वेलची पावडर आणि तुळशीची पाने घाला आणि झाकण ठेवा. अशाप्रकारे प्रसादाचा शिरा तयार होईल.
NEXT: Man Life Changes: वडिल झाल्यानंतर पुरूषांच्या आयुष्यात होतात 'हे' 5 बदल