Sakshi Sunil Jadhav
कामानिगडित घेतलेले तुम्ही निर्णय आणि अंदाज आज अचूक ठरतील. घराचे प्रश्न मार्गे लागतील. करिअरमध्ये उन्नतीचे दिवस आहेत.
देवी उपासना विशेष फलदायी ठरेल. एखादी महत्त्वाची घटना की जी आपण अनेक दिवस वाट पाहत होता अशी कानावर येईल.
कोणाचे सहकार्य कामाच्या ठिकाणी आज होईल अशी अपेक्षा टाळावी. वाणीवर नियंत्रण ठेवावे.
समोरच्या व्यक्तीवर तुमचा चांगला प्रभाव राहील. प्रियाजनांचा सहवासामुळे दिवस चांगला जाईल. ठरवलेल्या गोष्टी मनाप्रमाणे घडतील.
महत्त्वाची कामे शक्यतो आज नकोतच. पुढे ढकलणे जास्त चांगले ठरेल. काहीना मानसिक अस्वस्थता सुद्धा जाणवू शकते.
आर्थिक क्षेत्रामध्ये धाडस करायला हरकत नाही. व्यवसायामध्ये वाढ होईल. चांगल्या गोष्टींनी भारलेला आजचा दिवस आहे.
कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लागणारा आजचा दिवस आहे. एकूणच प्रगतीचा दिवस आहे.
शासकीय कामांमध्ये विशेष रस घ्याल आणि त्याचे प्रश्न मार्गी लागतील. वरिष्ठांच्या सहकार्याने पुढे जाल. जगण्यामध्ये जान असेल.
घरी आनंदी वातावरण राहील. कुटुंबीयांशी योग्य तो संवाद साधाल. कामामध्ये व्यस्त रहाल. हेच आजच्या दिवसाचे ध्येय असेल.
आज काही गोष्टी कामाच्या स्वरूपात नवीन होतील. हितसंबंध निर्माण होतील. स्वतःचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायामध्ये विशेष रस घेऊन पुढे जाल.
आपल्याविषयी अफवा सुद्धा उठू शकतात. वेळ, पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.काळजी घ्यावी.
अनेकांच्या सहकाऱ्याने आज पुढे जाल. महत्वाचे पत्र व्यवहार सुद्धा पार पडतील. परदेशी वार्तालाप होतील.