Saturday Horoscope : नवी संधी मिळणार; ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

रखडेलेले पैसे मिळतील आणि करिअर-व्यवसायात मोठ्या संधी मिळण्याची शक्यता आहे. नेतृत्वगुण खुलतील तसेच उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील.

मेष | Saam tv

वृषभ

आर्थिक प्रगती होणार. मान-सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याचे संकेत आहेत. नोकरी आणि व्यवसायात वरिष्ठांचे सहकार्य मिळून अपेक्षित यश मिळेल.

वृषभ राशी | SAAM TV

मिथुन

भाग्याची साथ लाभल्याने महत्त्वाची कामे पूर्ण होतील आणि करिअरमध्ये चांगली प्रगती दिसेल. धार्मिक प्रवासाचा योग असून मित्रांचे सहकार्यही लाभदायी ठरेल.

Mithun | saam tv

कर्क

कामकाजात अधिक सावध राहण्याची गरज असून कोणताही धोका पत्करू नये. लोभाला बळी न पडता विचारपूर्वक निर्णय घेतल्यास नुकसान टाळता येईल.

कर्क | Saam TV

सिंह

टीमवर्क आणि प्रभावी नेतृत्वामुळे कामात यश मिळेल. नातेसंबंध अधिक मजबूत होतील आणि करिअरमध्ये चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

सेवा क्षेत्रातील कामगिरी उत्कृष्ट राहील, मात्र खर्च आणि गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. शिस्त आणि संयम राखल्यास अपेक्षित लाभ मिळू शकतो.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

कला, कौशल्य आणि सर्जनशीलतेला नवी झळाळी मिळेल. प्रेमसंबंध आणि वैयक्तिक आयुष्यात आनंददायी घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

तुळ | saam tv

वृश्चिक

घरातील सदस्यांचे म्हणणे शांतपणे ऐका आणि घाईघाईत निर्णय घेणे टाळा. संयम आणि समजूतदारपणा राखल्यास कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात सक्रियता वाढेल. नवीन संपर्कांमुळे प्रतिष्ठा वाढून महत्त्वाच्या संधी मिळू शकते.

धनू | saam tv

मकर

घरात आनंदाचे वातावरण राहील आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढेल. नातेवाईकांच्या भेटीगाठींमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होईल.

मकर | Saam Tv

कुंभ

नवीन कल्पना आणि आधुनिक कामांमध्ये वेग येईल. कला-कौशल्याच्या जोरावर महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती सुधारेल.

कुंभ | Saam Tv

मीन

तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे.

Meen Rashi | Saam TV

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

horoscope | saam tv

NEXT: जुन्या बँक खात्यातले पैसे विसरलात? RBI च्या मदतीने मिळवा तुमची रक्कम

Dormant Bank Account | google
येथे क्लिक करा