RBI: जुन्या बँक खात्यातले पैसे विसरलात? RBI च्या मदतीने मिळवा तुमची रक्कम

Sakshi Sunil Jadhav

जुन्या खात्यातली रक्कम

बरेल लोक नोकरी, बदली किंवा इतर कारणांमुळे जुन्या बँकेचं खातं बंद करायला विसरतात. पण त्या खात्यातली रक्कम कायमची नष्ट होत नाही.

Dormant Bank Account | google

१० वर्षांहून जास्त जूनं खातं

जर तुमचं खातं १० वर्षांपेक्षा जास्त दिवस निष्क्रिय राहिलं आणि त्यावर दावा झाला नाही, तर ती रक्कम RBIच्या ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीत वर्ग केली जाते.

Old Bank Account Money

DEA फंडातले पैसे मिळतात का?

तुमची रक्कम DEA फंडात गेली असली तरी तुम्ही किंवा कायदेशीर वारस त्यावर दावा करू शकतात. त्यामुळे पैसे कायमचे गमावले जात नाहीत.

Old Bank Account Money

UDGAM पोर्टल

RBI ने UDGAM पोर्टल सुरु केलं आहे. या पोर्टलवर जाऊन तुमच्या नावावर कोणत्याही बँकेत दावा न केलेली ठेव आहे का, हे सहज तपासता येतं.

DEA Fund

बँकेशी संपर्क साधा

दावा करण्यासाठी संबंधित बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन अर्ज करता येतो. त्यासाठी मूळ शाखेत जाणे आवश्यक नाही.

DEA Fund

KYC कागदपत्रे सादर करावी लागतील

दावा करताना आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी वैध KYC कागदपत्रे सादर करावी लागतात.

DEA Fund

व्याजाची रक्कम

नियमांनुसार लागू असलेल्या खातेदाराला मूळ रकमेबरोबर व्याजाचाही लाभ मिळू शकतो. याबाबतचा अंतिम निर्णय संबंधित बँकेच्या प्रक्रियेनुसार घेतला आहे.

DEA Fund

कुटुंबियांचे खाते

तुमच्या पालकांचे, आजी-आजोबांचे किंवा इतर कुटुंबीयांचे जुने निष्क्रिय खाते असेल तर त्यातल्या रकमेवर कायदेशीर वारस दावा करू शकतात.

DEA Fund

फसवणूक टाळा

दावा करण्यासाठी फक्त RBI चे UDGAM पोर्टल आणि संबंधित बँकेची अधिकृत शाखाच वापरा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला शुल्क किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका.

DEA Fund

NEXT: लोणावळा धुक्याच्या चादरीत हरवलं; पिकनिकला जाण्याआधी 'या' ८ महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या

Lonavala Rain | google
येथे क्लिक करा