Sakshi Sunil Jadhav
मनातल्या इच्छा पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे. मित्र-मैत्रिणींबरोबर एखादे सेलिब्रेशन कराल.
कलाकारांना विशेष गती आणि प्रगती मिळेल. आपल्या बाजूने चांगले कार्य करत रहा.
विष्णू उपासनेने मनोरथ पूर्ण होतील. लांबचे प्रवास होतील. शनि प्रदोष विशेष उपासना करावी.
कितीही केले तरी आपल्याला केलेल्या गोष्टीचे क्रेडिट मिळत नाही ही भावना आज जाणवेल. कदाचित एकटे पडाल.
आपले वर्चस्व व्यवसायामध्ये राहणार आहे. आयुष्याला कलाटणी मिळणाऱ्या गोष्टी सुद्धा घडतील. कोर्टाचे निकाल मनाप्रमाणे लागतील.
"मन चिंती ते वैरी न चिंती" असा दिवस आज दिसतो आहे. विनाकारण संशय विनाकारण चिंता या आज टाळाव्यात. आजोळी प्रेम मिळेल.
आज आपल्या प्रेयसी आणि प्रियकराबरोबर आनंदाचे क्षण व्यतीत करणार आहात. लक्ष्मी उपासना करावी. धनयोग सुद्धा येतील.
जमिनीशी निगडित व्यवसाय क्रियविक्रय बैठका, घराची बांधकामे सुरळीत होण्याचा संभव आहे. कुटुंबीयांची भक्कम साथ आपल्याला आज मिळेल.
भावंडांवर विशेष प्रीती जडेल. उमेद वाढवणाऱ्या घटना घडणार आहेत. जवळचे प्रवास होतील.
"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" आज आपण कष्ट आणि मेहनत करत आहात त्याचे योग्य ते फळ मिळणार आहे.
संशोधनात्मक कार्य आज आपल्याकडून घडण्याचा दिवस आहे. नकारात्मकता निघून जाईल.
काही गोष्टी आपल्या साध्या स्वभावामुळे अडकण्याचे योग आज दिसत आहेत. विनाकारण कटकटी मागे लागतील.