Sakshi Sunil Jadhav
दिवस चांगला आहे. नवीन वाहनांचे खरेदीचे नियोजन असेल तर आज ते सत्यात उतरतील.
संतती पासून लाभ होतील व्यवसायामध्ये प्रगती होईल. करिअरच्या ठिकाणी मात्र घेतलेले कष्ट तसे पूर्णत्वाला जाणार नाही. अडचणी निर्माण होतील.
स्थळी, पाषाणी व्यवहार आणि पैसा असेच आजकाल युग चालू आहे. आपणही याला अपवाद नाही. धनयोगाला दिवस उत्तम आहे.
आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायला आवडते.कुटुंबीयांशी प्रेमाचे संबंध ठेवायला आवडतात पण आज काही वेगळं करावसं वाटेल.
आनंदावर विरजण पडण्याच्या अनेक गोष्टी असतात. आज काही ठराविक गोष्टी त्रासदायक ठरू शकतात.
आनंदासाठी जगायचे असते असे आपल्याला नेहमीच वाटते. आपण मन आणि बुद्धी याचा कौल घेऊन आज वागणार आहात.
रसिकता वाढीला लागेल. कामाच्या ठिकाणी जीव ओतून काम कराल.अर्थात ते वाया जाणार नाही. आपल्या सहकाऱ्यांच्या कडून विशेष मदत मिळेल.
कुलस्वामिनीची उपासना लाभदायी ठरणार आहे. जे कराल ते श्रद्धेने कराल. तीर्थक्षेत्र भेटी सुद्धा होतील.
कामामध्ये मैलाचा दगड पार पाडावा लागेल. काही वेळेला निर्णय घेता येत नाही. कुठल्यातरी मोठ्या व्यक्तीच्या संपर्कात रहा.
कष्टाला आज दुसरा पर्याय नसणार आहे. पण दुधात साखर म्हणजे केलेल्या कष्टाचे द्विगुणित फळ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. यश खेचून आणाल.
तब्येतीच्या तक्रारी एवढ्यात आपल्या वाढल्या आहेत. शत्रूंचे काम त्यांना करू दे. तुम्ही तुमचे काम करावे.
आपल्या पेक्षा एक पाऊल पुढेच अशी आपली संतती आहे. त्यांच्याकडून प्रगतीचे अनेक संदेश येतील.