Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात तुम्ही काही भाज्यांच्या साहाय्याने कुरकुरीत भजी बनवून पावसाचा आनंद घेऊ शकता.
कांदा, बटाटा, कोबी, पालक,मेथी, हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट घ्या.
बेसन,तांगळाचं पीठ, हळद, लाल तिखट, हिंग, मीठ, पाणी, तेल इ.
सर्व भाज्या बारीक चिरून एका मोठ्या बाउलमध्ये घ्या. त्यात हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, हळद, तिखट, हिंग आणि मीठ घाला.
बेसन आणि तांदळाचं पीठ घालून सगळं एकत्र करा.
फारसं पाणी न घालता भाज्यांमधून येणाऱ्या ओलसरपणावर भजीचं पीठ तयार करा.
कढईत तेल गरम करा. थोडं-थोडं पीठ हाताने सोडून कुरकुरीत भजी तळून घ्या.
गरमागरम मिक्स वेज भजी हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.